सैलानीबाबा दर्गा परिसरातील 4 हेक्टर जमीन संपादीत करण्याच्या प्रक्रियेस सुरवात…ट्रस्ट अध्यक्षांनी केली होती मागणी..*

0
383

*सैलानीबाबा दर्गा परिसरातील 4 हेक्टर जमीन संपादीत करण्याच्या प्रक्रियेस सुरवात…ट्रस्ट अध्यक्षांनी केली होती मागणी..*

बुलडाणा ( प्रतिनिधी )
बुलडाणा:- प्रसिद्ध असलेले सैलानी बाबा दर्ग्यावर लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी सैलानी बाबा दर्गा सभोवातील 4 हेक्टर जमीन संपादीत करण्याच्या प्रक्रियेला जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांकडून सुरुवात करण्यात आली आहे.सैलानी बाबा दर्गा सभोवातील 4 हेक्टर जमीन संपादीत करून देण्यासंदर्भात सैलानी बाबा अस्थाई ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे मागणी केली होती.या पत्राची कॉपी त्यांनी मुख्यमंत्री,अवकाफ मंत्री तथा महसूलमंत्री यांना ही पाठविल्या होत्या.त्यानुसार महसूलमंत्री यांच्याकडून भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांना संपादित करीत असलेल्या जमिनीचा परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना 16 जुलै 2021 रोजी एका पत्राद्वारे केली आहे..

बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांची शेकडो वर्षी जुनी प्रसिद्ध दर्गा आहे.दर्ग्याचा कारभार महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मार्फत नियुक्त केलेल्या अस्थाई ट्रस्ट द्वारे चालतो.दरवर्षी होळीच्या सणावर बाबाच्या संदलला याठिकाणी भारतभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.सैलानी याठिकाणी बाबाच्या दर्ग्यासाठी असलेली एक गुंठा जागे व्यतिरिक्त दर्गा सभोवातील सर्व जागा मुजावरांची असल्याने भाविकांना सोयी-सुविधा मिळत नसल्याने व याठिकाणी मुजावर यांनी आपली घरे व दुकाने बांधल्याने भाविकांना दर्शनासाठी अडचण निर्माण होत आहे.असा दाखला देत सैलानी बाबा अस्थाई ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी सैलानी बाबा दर्गा सभोवातील 4 हेक्टर जमीन संपादीत करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे मागणी केली होती.या पत्राची कॉपी त्यांनी मुख्यमंत्री,अवकाफ मंत्री तथा महसूलमंत्री यांना ही पाठविल्या होत्या.त्यानुसार महसूलमंत्री यांच्याकडून भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांनी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांना संपादित करीत असलेल्या जमिनीचा परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना 16 जुलै 2021 रोजी एका पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here