0
156

समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातातील त्या 13 परप्रांतीय मजुराचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावा कडे रवाना …..


सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव येथील समृद्धी महामार्गावर काम करणार्‍या परप्रांतीय मजुरांना अपघातात मृत्यू झाला होता या दुर्दैवी अपघातात 13 मजूर जागीच ठार झाले होते तर दोन मजूर गंभीर जखमी झाले त्यामुळे या अपघातात मृत्यू पावलेल्या परप्रांतीय अंत्यसंस्कार कोठे करनार असा प्रश्न निर्माण झाला होता अखेर त्या मृतकावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करावे असे ठरल्याने त्या मृतकाच्या तहसील मधून आलेली दोन नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि सिंदखेड राजा चे तहसीलदार सुनील सावंत यांनी प्रशासनाच्या वतीने तात्काळ कारवाई करत जालना येथून 13 ॲम्बुलन्स मध्ये त्या मृतकाचे मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्यात आले
काल दिनांक 20 ला समृद्धी महामार्गाच्या कामावर असलेले मजूर काम करण्यासाठी कामावर गेले होते मात्र पावसाची रिपरिप सुरु असल्याने काम बंद होते त्यामुळे कामावर गेलेले 15 मजूर . एमएच ११ एएल ३७२० या क्ररमांकाचा टिप्पर मध्ये बसून परत आपल्या तात्‍पुरत्‍या निवासस्‍थानांकडे निघाले मात्र अचानक काळाने घाला घातला समोरून येणाऱ्या एसटी बसला वाचवताना टिप्पर रस्‍त्‍याच्‍या कडेला पलटी झाले. त्यामुळे या टिप्पर मध्ये लोखंडी सळ्या आणि सिमेंट असल्याने यात बसलेले 15 मजुरां पैकी गणेश डावर (20, रा. मेलखेडी जि.खरगोण)
गोविंद शिलोड (25, रा. भोंडल जि. धार)
नारायण डावर (25, मेलखेडी जि. खरगोण)
करण मकवणे (19, काकलपूर जि.धार)
दीपक डावर (21, मेलखेडी जि.खरगोण)
सुनील डावर (22, मेलखेडी जि.खरगोण)
दिनेश गावड (२७, हनुमत्या जि.धार)
जितेन मकवणे (19, मकशी जि.खरगोण)
दिलीप कटारे (25, अंबापूर जि.धार)
मिथुन माचारे (19, तारापूर जि.धार)
लक्ष्मण डावर (20, मोहिदा जि. खरगोण)
महेश कटारे (31, बाबलाई जि.खरगोण)
देवराम ओसरे (21, कचिकुवा जि.खरगोण)
हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील आहेत ते जागीच दबून ठार झाले झाले, तर लोकेश आणि रघुनाथ हे
दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात नशीब बलवत्तर म्हणून चालकासोबत केबिनमध्ये बसलेली १२ वर्षीय मुलगी वाचली . अपघात होताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच तेथेच कामावर असेल उपस्थितांनी या मजुरांना बाहेर काढले त्यानंतर त्यांना जालना येथे नेण्यात आले त्यानंतर या अमृतावर अंत्यसंस्कार कुठे करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर त्या मृत अंगावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात ठरल्याने मध्यप्रदेश मधून दोन नायब तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक हे जालना येथे मृतदेह घेण्यासाठी आले यावेळी सिंदखेड राजा तहसीलदार सुनील सावंत नायब तहसीलदार अनिल मोरे मध्य प्रदेशातील मृतकाच्या तालुक्यातील नायब तहसीलदार महेश्वर राहुल सोलंकी नायब तहसीलदार कसरावद
संजीव साठे उप निरीक्षक महेश्वर
ज्ञानेंद्र यादव आरक्षक महेश्वर आदींच्या हवाली मृतदेह सुपूर्त करण्यात आले यावेळी तेरा अंबुलन्स द्वारे ज्या 13 जणांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले यावेळी सर्व वातावरण शोकाकुल झाले होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here