*शेतकऱ्यांनी केली गौरींची ट्रॅक्टरवर प्राणप्रतिष्ठा*
*Anchor* :- तेज मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या गौरींची स्थापनाच एका शेतकऱ्याने चक्क ट्रॅक्टरवर करून.. ट्रॅक्टरला शेतकऱ्यांच्या समृद्धीचं प्रतीक असल्याचा देखावा सादर केला आहे…..
पोळा झाला की सणावारांना सुरुवात होते …गणपतीबाप्पाचं आगमन होत..आणि लगेचच जेष्ठागौरीं देखील सोनपावलांनी आपल्या घरी येत असतात…महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गौरीचं आगमन होतं… विदर्भात सायंकाळी गौरीचं आगमन होतं.. घरोघरी आपापल्या पद्धतीने गौरींसाठी सजावट केली जाते…परंतु एखादी सजावट इतरांपेक्षा आगळीवेगळी ठरते..तशीच एक सजावट बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे करण्यात आली आहे…गौरींना चक्क ट्रॅक्टरवर विराजमान करण्यात आले असून हा देखावा डोळ्याचं पारणं फेडणारा आहे… चिखली येथील काळे कुटुंबीयांनी हा देखावा त्यांच्या घरात मांडलाय गौरींना ट्रॅक्टर विराजमान करून त्यांनी समाजाला आणि शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय