अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी.*
बुलडाणा तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले होते या नुकसानीची पाहणी आज दि १४/९/२०२१ रोजी राज्याचे महसूल राज्यमंत्री मा ना अब्दुल सत्तार यांनी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी यांच्यासोबत केंद्रीय ग्रामविकास समिती अध्यक्ष खा प्रतापराव जाधव आ डॉ संजय रायमुलकर , मा आ संजय गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हा कृषी अधिकारी श्री नाईक साहेब, तहसीलदार श्री खंडारे गट विकास अधिकारी श्री सावळे उपस्थित होते
नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून कृषी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतीवर पंचनामे करून तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना यावेळी मंत्री महोदय यांनी दिल्या. तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती ही पुराच्या पाण्याने खरडून गेली त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून मदतीसाठी मुख्यमंत्री मा ना उद्धवजी ठाकरे साहेब यांना विनंती करणार असल्याचे यावेळी सांगितले.