रेतीचा ट्रक कारवाई न करता 50 हजारात सोडला ,,, 35 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात अडकला …

0
377

रेती ट्रक कारवाई न करता 50 हजारात सोडला ,,, 35 हजाराची लाच स्वीकारताना पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात अडकला …

देउळगाव राजा (पतिनिधी )
रेतीचा ट्रक सोडून देण्यासाठी 35 हजाराची लाच स्वीकारताना देऊळगाव राजा पोलिस स्टेशन मधील पोलीस शिपायांला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे

देऊळगाव राजा येथील एका व्यावसायिकाचा ट्रक हा रेतीची वाहतूक करत असताना देऊळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई संजय चवरे यांनी त्यांचा ट्रक पकडला होता त्यानंतर कोणतीही कारवाई न करता मला पन्नास हजार रुपये द्या मी तुमचा ट्रक सोडून देतो अशी तडजोड त्या वेळी करण्यात आली त्यानंतर पोलीस शिपाई संजय चवरे यांनी हा ट्रक सोडून दिला त्यानंतर गावातील दत्तात्रय शिंगणे यांच्यामार्फत संबंधित ट्रक मालकाला 50 हजार रुपयांची मागणी केली दरम्यान ट्रक मालकाने या संदर्भाची तक्रार बुलढाणा येथील लाचलुचपत विभागाकडे केली 50 हजारा पैकी 35 हजार चा पहिला हप्ता देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे शिपाई संजय चवरे यांना देण्यात आला त्यावेळी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस शिपाई संजय चवरे आणि दत्तात्रेय शिंगणे या दोघांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. सदरची कारवाई देऊळगाव राजा शहराततील पाबळे मोटर्स समोर 21 सप्टेंबर का करण्यात आली याप्रकरणी संबंधित आरोपी पोलीस शिपाई संजय चवरे आणि दत्तात्रेय शिंगणे यांच्याविरुद्ध लाचलुचपत विभागांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आली असून या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई बुलढाणा येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे पोलीस शिपाई महादेव चव्हाण विलास साखरे अझरुद्दीन काजी यांच्या पथकाने केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here