गारपीटीचे 2 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
मलकापूर पांग्रा दुसरबीड मंडळातील शेतकऱ्यांना लाभ
सिंदखेड राजा प्रतिनिधी =
रब्बी हंगाम जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बागायती आणि जिरायती पीक पक्षाच्या जमीनदोस्त झाली याची दखल घेत तहसीलदार सुनील सावंत यांनी तात्काळ सर्वे करून झालेल्या नुकसानाची अनुदानाची मागणी शासनाकडे केली होती त्यानुसार मिळालेल्या अनुदानातून गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 2 कोटी 39 लाख 90 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आसल्याने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे संयुक्त खाते आहे आणि वाद चालू आहेत अशा शेतकऱ्यांनी किंवा ज्यांनी चुकीचे खाते क्रमांक दिलेले आहेत त्यानी थेट संपर्क साधावा अश्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार सुनील सावंत यांनी दिली
सिंदखेड राजा तालुक्यात रब्बी हंगाम 2021मध्ये फेब्रुवारी महिन्यात मलकापूर पांग्रा दुसरबीड सर्कलमध्ये प्रचंड गारपीट झाली होती यामध्ये कांदा मका गहू हरभरा ज्वारी आदीसह रब्बी हंगामातील विविध पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते पिके अक्षरशा जमीन दोस्त झाली होती याची दखल घेत तहसीलदार सुमन सुनील सावंत यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले होते त्यानुसार दुसर बीड मलकापूर पांगरा मंडळांमध्ये 3 कोटी 2 लाख 50 हजाराची मदत प्राप्त झाली होती त्यापैकी या दोन सर्कल मधील 2973 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुमारे दोन कोटी 40 लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे सदर मदत बागायती पिकासाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर आणि जिरायती पिकासाठी 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टरी मदत देण्यात येणार असल्याने अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना या मदतीने थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे