* सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी काढणार एल्गार मोर्चा ..
Anchor – अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे या शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी आठ हजार रुपये आणि कापूस साठी 12 हजार रुपये स्थिर भाव द्यावा ओला,ओलादुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये तात्काळ मदत द्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाची सुरुवात 31 ऑक्टोंबर पासून बुलढाणा जिल्ह्यातून होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे यासंदर्भात ची माहिती देण्यासाठी त्यांनी आज बुलढाणा येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झालाय तेव्हा या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकारने पुढे आल पाहीजे होत पण सरकार यासंदर्भात कोणतीही भूमिका घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश एल्गार मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार असल्याचे त्यांनी सांगितले राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा शेतकऱ्यांसाठी भरीव अशी मदत करत नसल्यामुळे या महाविकासआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केलं ते म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्ये यासंदर्भात चर्चा झाली आहे आणि एक महिन्याच्या आत स्वाभिमानी शेतकरी संघटना या संदर्भात ठोस भूमिका घेऊन सरकारमधून बाहेर पडणार आहेत जे सरकार शेतकऱ्यांना मदतच करायला तयार नसेल तर त्या सरकार सोबत राहून काय फायदा अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिले मागील वर्षीचा व चालू वर्षी चे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळाले नाहीत ते तात्काळ द्यावे ,सोयापेंड आयात थांबवावी पाम तेल व खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवावा, खाद्यतेल व तेलबिया वरील स्टॉक लिमिट अट शिथिल करावी, सोयाबीनचा बाजारभाव आठ हजार रुपये असताना पाच हजार रुपयाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या महाबीजने भाव फरक रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी अशी मागणी यावेळी केली……
आंदोलनाची ठिणगी पडली……
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पत्रकार परिषद घेण्यापूर्वी घेण्यात आली या बैठकीमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस शेतकऱ्यांनी या बैठकीत आणला होता या सोयाबीनची होळी करून एल्गार आंदोलनाची घोषणा करण्यात आली जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही तोपर्यंत या आंदोलनाची ठिणगी धगधगत ठेवायचा असा निर्णय या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आल
*Yuwaraj wagh buldana*