*एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी भत्ते, थकबाकी द्या, या मागणीसाठी एस टी चे आंदोलन सुरु एस टी बस बंद…*
*Anchor* : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या अन्यथा संप करू असा इशारा ऐन दिवाळीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेने शासनाला दिला होता. यावर समाधानकारक तोडगा न निघाल्याने आज पासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारतुन एस टी बस डेपो बाहेर निघाली नसून कर्मचारी रस्त्यावर आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करावे तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी देण्यासंदर्भात एसटी प्रशासनाकडे एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने 27 ऑक्टोबर रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्यानुसार आज 28 ऑक्टोबरला बुलढाणा जिल्ह्यातील एस टी महामंडळांचे चालक, वाहक, आणि महामंडळ मधील सर्व कर्मचारी या आंदोलनत सहभागी झाले सकाळ पासून एस टी बसेस जाग्यावरच आहे. या आंदोलनात 17 संघटनांचा सहभाग संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन होत आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावरच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे त्याचा फटका जनसामान्य प्रवाशांना बसत आहे…..