बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर धाडसी दरोडा.एक कोटींचा मुद्देमाल लुटून नेल्याचा प्रार्थमिक अंदाज.एन दिवाळीत खातेदारांच्या सोन्यावर मारला डल्ला…
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आज संध्याकाळच्या सुमारास धाडसी दरोडा पडला आहे.बंदुकी घेऊन आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असून 25 लाख रुपये रोख रकमेसह कर्जदारांनी गहाण ठेवलेले लॉकर मधील 70 लाखांचे सोने सशस्त्र दरोडेखोरांनी लुटून नेल्यानं एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या लुटमारीचं सीसीटीव्ही फुटेज यात महत्त्वाचे ठरणार असल्याने पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहे.