वृद्ध ,निराधार, अपंगांच्या मानधना संदर्भात आम आदमी पार्टीचे धरणे आंदोलन… –
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे ,नो स्कूल नो फी तसेच अपंग आणि वृद्ध निराधारांचे मानधन दरमहा अडीच हजार रुपये करावे व अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधन्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे..
– गेली दोन वर्षांपासून कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता,टाळेबंदीमुळे व्यापार उद्योगाला फटका बसला, बऱ्याच जणांच्या नोकरीही गमवावी लागली आर्थिक चक्र थांबले किंबहुना ते बंद झाले. त्यामुळे जाळीमंदी कड्यातील वीज बिले माफ करावीत शाळा बंद असतानाही अनेक शाळांचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून वसुली करत आहेत ते तात्काळ समवेत आणि गोरगरीब निराधारांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करुन ते दोन हजार पाचशे करावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर आज संविधान दिनाचे औचित्य साधून आंदोलन करण्यात आले