अन्नत्याग आंदोलनादरम्यान झालेल्या अनुचित प्रकारासाठी रविकांत तुपकर व त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांना केली अटक..

0
182

अन्नत्याग आंदोलनादरम्यान झालेल्या अनुचित प्रकारासाठी रविकांत तुपकर व त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांना केली अटक..


AN: सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनेला तुपकर दाम्पत्याला जबाबदार धरून आज बुलडाणा पोलिसांनी तुपकर दाम्पत्याला अटक केली आहे.. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या होत्या.. यामध्ये पोलिसांच्या वाहनाची तोडफोड झाली होती व तहसीलदारांची गाडी जाळण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी ‘स्वाभिमानी’चे रविकांत तुपकर, त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर, ज्ञानेश्वर टाले, आकाश माळोदे,भागवत सुसर यांच्यासहया अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याप्रकरणात आज रविकांत तुपकर व त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर, यांना काही आंदोलकांसह बुलडाणा पोलिसांनी अटक केली आहे.
दुपारी या सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत. सदर गुन्ह्यातील काही कलम हे अजामीनपात्र असल्याने न्यायालय त्यांना जमीन देते की नाही हे पाहावं लागणार आहे. जर न्यायालयाने जमीन दिला नाही तर तुपकर दांपत्यासह कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी होईल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here