- [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
आज राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचा 424 वा जन्मोत्सव साजरा होतोय.. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे राष्ट्रमाता जिजाऊचा जन्मस्थळ 12 जानेवारीला राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाला अभिवादन करण्यासाठी जिजाऊ भक्त येत असतात परंतु कोरोनाचे सावट असल्यामुळे हा जन्मोत्सव सोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला आहे… आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ यांच्या पुतळ्याचं पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अभिवादन केलं व जिजाऊवंदना गाऊन राष्ट्रमाता जिजाऊ चरणी नतमस्तक झाले त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव माजी आमदार शशिकांत खेडेकर राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते जिजाऊ भक्तांनी राजमाता जिजाऊना अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचे नारा दिले त्यामुळे राजे लखोजी जाधव यांचा राजवाड़ा दणाणुन गेला होता राजमाता जिजाऊनां अभिवादन करण्यासाठी काही युवक राजे छत्रपत्री शिवाजी महाराजाच्या वेशभुषेत आले होते तर महीला आणि पुरूषांनी सुद्धा भगवे फेटे परिधान केले होते..