बुलढाणेकरसाठी मकर संक्रांतीला कडू बातमी… बुलढाण्यात कोरोनाचे शतक…. तर जिल्ह्यात द्विशतक …सावधान मास्कचा वापर करा … सुरक्षित अंतर ठेवा…. गर्दीत जाणे टाळा …. बुलढाणा जिल्ह्यात आज 209 कोरोना रुग्णांची भर पडली असून यातील 100 कोरोना रुग्ण हे बुलढाणा तालुक्यातील असल्याने बुलढाणा मुख्यालयातच्या चितेत भर पडली आहे
आज 14 जानेवारीला कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्याचा अहवाल प्रशासनाच्यावतीने प्राप्त झाला असून या अहवालामध्ये नव्याने 209 रुग्णांची भर पडली आहे त्यामुळे
जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या ही 692 वर जाऊन पोचली आहे यातील 100 रुग्ण हे बुलढाणा तालुक्यातील असून खामगाव, 32 शेगाव, 26 मलकापूर 5, मोताळा 4,नांदुरा 18,चिखली, आणि लोणार 6 एकूण 209 रुग्ण आहे… प्रत्येकानी कोरोना नियमाचे पालन करा…