[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
चिखली (प्रतिनिधी ) वीज वितरण कंपनीने चिखली तालुक्यातील आणि आसपासच्या सर्वच खेड्यांतील कृषी वीज पंपांचा वीजपुरवठा खंडीत करून शेतकऱ्यांना कोंडीत पकडले आहे. परिणामी असंख्य शेतकरी कुटुंबांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अचानक सामोर जाव लागत आहे. शिवाय सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वीज वितरण कंपनीच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्यावतीने चिखली येथील वीज वितरण कार्यलयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे..
व्हिओ – शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करणे तर दूरच आता अवास्तव बिले शेतकऱ्यांना दिली जात आहे.वसुलीसाठी आडमूठ धोरण राबवित वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम थांबवावी, तातडीने वीजपुरवठा जोडून द्यावा तसेच जेवढी वीज वापरली तेवढ्याच युनिटचे बिल आकारावे,अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासु पाटील यांनी दिला आहे..