महासिद्ध अर्बन धान्य गोडाऊन मधील चोरीप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद...
4 लाख 66 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल ताब्यातून हस्तगत…
जळगाव जामोद येथील धान्य गोडाऊन मध्ये झाली होती चोरी…
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील खेर्डा रोडवरील कृषी विज्ञान केंद्रा समोरील महासिद्ध अर्बनच्या धान्य गोडाऊन मधून 11 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी सोयाबीनचे 37 कट्टे आणि तुरीचे 7 कट्टे असा मुद्देमाल चोरी केला होता, या चोरीप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी केले नऊ आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले असून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे…
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अविनाश जाधव, दीपक , संजय बांगर, मोहम्मद यासीन शेर ,लाल कुरेशी, विजय इंगळे, राहुल तायडे ,सुभाष मात्रे, शेख जाकीर शेख सलीम, स्वप्निल दाभाडे या आरोपीचा समावेश असून त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली आहे, आरोपीच्या ताब्यातून एकूण 4 लाख 66 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे…