शेतकऱ्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा चक्काजाम..सोलापूर -नागपूर महामार्गावरील काही काळ खोळबली स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

0
228

*शेतकऱ्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा चक्काजाम..सोलापूर -नागपूर महामार्गावरील काही काळ खोळबली स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना पोलीसांनी घेतले ताब्यात*

बुलडाणा : — शेतकऱ्यांना दिवसाला वीज पुरवठा देण्यात यावा या मागणीसाठी बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आज सोलापूर-नागपूर या महामार्गावरील चिखली तालुक्यातील पेठ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारीपासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे.. मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती.. त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यात ठिकाणी आंदोलने करण्यात आली आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील सोलपुर -नागपूर महामार्गावरील पेठ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे.. यावेळी महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास उद्यापासून संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे दरम्यान चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी सगळ्यांनी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अमडापुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here