नेत्रतपासणी शिबिरातून अनेकांना मिळाली नवी दृष्टी…
जालिंदर बुधवत यांचा मासरूळ सर्कल मध्ये स्तुत्य उपक्रम…
12 हजारापेक्षा जास्त नागरिकांची तपासणी, तर 10 हजारावर चष्म्यांचे वाटप…
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून बुलडाणा तालुक्यातील मासरुळ या जिल्हा परिषद सर्कल मध्ये प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन करत, नेत्र तपासणी करून मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, पंधरा दिवसांपासून राबविण्यात येत असलेल्या या शिबिराचा मासरूळ गावात शेकडो गावकर्यांच्या उपस्थित समारोप करण्यात आला… मुंबई येथील मातोश्री फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने सर्कलमधील प्रत्येक गावात राबविण्यात येत असलेल्या शिबिरामध्ये जवळपास बारा हजारांपेक्षा जास्त नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली, ज्यामध्ये दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले…
आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदू झालाय अशा सर्व नागरिकांना विविध ठिकाणी नेऊन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात आली… मासरूळ जिल्हा परिषद सर्कल हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे नागरिक देत असलेल्या भरभरून प्रेमापोटी त्यांची कृतज्ञता व्यक्त करत उतराई म्हणून खऱ्या अर्थाने, शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला… कोरोनाच्या संपूर्ण काळा नंतर अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात डोळ्यांचे आजार जाणवू लागले, त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले, ज्यामुळे हजारो नागरिकांना नवीन दृष्टी मिळाली आहे…