सौ राजमती विवेक ठेंग याना विज्ञान प्रतिभा पृरस्कार
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर बुलडाणा च्या सौ राजमती विवेक ठेंग याना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल नावाने दिला जाणारा “””विज्ञान प्रतिभा “””पृरस्कार जाहीर ब जाहिर झाला आहे एप्रिल महिन्यात या पुरस्काराचा वितरण सोहळा होणार आहे
जळगाव – राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जळगाव येथील विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी अग्रगण्य संस्था नोबेल फाउंडेशन आणि श्रम साधना ट्रस्ट चे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे “राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार” जाहीर करण्यात आले आहेत. विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या संस्था, शाळा ,शिक्षक आणि विद्यार्थी अशा तीन गटात पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या प्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्र कुलगुरू डॉ पी पी माहुलीकर यांनी केली.
.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील विज्ञान प्रतिभा पुरस्कार बुलढाणा येथील राजमती ठेंग यांना जाहीर झाला आहे.
याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू डॉ. पी पी माहुलीकर, निवृत्त प्राध्यापक डॉ एस व्ही सोमवंशी , धुळे महानगरपालिका उपायुक्त कपिल ,पवार चार्टर्ड अकाउंटंट नीरज अग्रवाल, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. संजय शेखावत, एसएसबीटी चे डॉ किरण पाटील ,शिक्षक रामचंद्र पाटील,स्त्रीरोग तज्ञ डॉ संदीप पाटील , शिक्षक अतुल पाटील ,नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील , व्यवस्थापक राजेंद्र पाटील,अमोल पवार उपस्थित होते.
.