मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये महिला दिन साजरा
बुलडाणा, दि 14 (जिल्हा प्रतिनिधी) — येथील मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये जागतीक महिला दिना निमीत्त विविध कार्यक्रम आयोजीत करुन जागतीक महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात विद्यार्थीनीनी मोठ्या संख्येने सहभाग
नोंदविला. कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने झाली. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबांच्या प्रतिमा पूजन,माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे मानद संचालक प्रा. डॉ. केदार ठोसर उपस्थीत होते. जागतीक महिला दिना निमीत्त त्यांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून महिला
दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अर्चना देव व पद्मजा अहिर उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून रेशम शुक्ला
हिने जबाबदारी पार पाडली. तसेच कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा.पूनम डिडोळकर यांनी सर्वस्वीपणे कार्यक्रम आयोजीत करण्यास हातभार लावला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रध्दा सपकाळ व अंजली लोखंडे यांनी केले.विध्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना सौ. अर्चना देव यांनी विद्यार्थीनिंना त्यांच्या मानसिक अवस्था, शारीरिक व सामाजिक अवस्थांची
माहिती दिली. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वयातील बदल व अडचणींना सामोरे कसे जावे, त्याचप्रमाणे मानसिक बदलांचा स्वीकार व मानसिक
स्वास्थ्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पदमजा अहिर यांनी स्त्रीयांमधील असलेले संस्कार पटवून दिले. भारतीय संस्कृती व संस्कार
किती महत्वाचे आहेत हे पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक वैष्णव सुर्यवंशी हिने केले. तर आभारप्रदर्शन समृद्धी परघरमोर हिने केले. सर्व
विद्यार्थीनी वेगवेगळ्या वेशभूषेत येऊन आपली उपस्थीती दर्शविली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीसाठी प्रा.रुपाली हिवाळे, स्वाता कस्तूरे,प्रा. प्रेरणा पाटील, प्रा.गायकी, प्रा. सरला ताजणे, प्रिया लिंबानी
फिरदोज अंजुम खान, इत्यादींनी परिश्रम घेतले.