हिंदू मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा दर्गावर प्रशासनाच्या उपस्थीतीत चढला संदल… बुलडाणा
हिंदू मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी हजरत अब्दूल रहेमान ऊर्फ सैलानी बाबाचा 114 वा संदल 22 मार्चच्या रात्री चोख पोलीस बंदोबस्तात प्रशासनाच्या मदतीने मजार -ए- शरीफवर मुजावर परिवाराच्या हस्ते चढविण्यात आला
– बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गाह आहे. सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबांच्या दर्गाहवर दरवर्षी लाखो भक्त हजेरी लावतात. कोरोना महामारी मुळे सलग तीन वर्षापासून सैलानी बाबाची यात्रा जिल्हा प्रशासन स्थगित केली होती संदलच्या वेळी दर्गाह जवळ भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने मुजावर परिवाराला लवकर संदल चढविण्याची विनंती केली होती व प्रशासनाच्या या विनंतीला मान देऊन मुजावर परिवाराने इतिहासात पहिल्यांदाच 22 मार्चच्या दुपारी 3 वाजता पोलिस जीप मध्ये पिंपळगाव सराई येथून संदल अत्यंत साधेपणाने काढला व सायंकाळी साडेसात वाजता संदल मजार ए शरीफ पर चढविण्यात आला.
दरवर्षी संदल जंगलातील कच्च्या रस्त्याने नेल्या जाते परंतु भाविकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी यावेळी मुख्य मार्गाने संदल काढण्यात आले. संदल चढविताना शेख हाशम मुजावर शेख रफिक मुजावर शेख शफीक मुजावर शेख चांद मुजावर शेख कदीर मुजावर यांच्यासह मुजावर परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.