धाड येथील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जालिंधर बुधवत बिनविरोध निवड

0
240

धाड येथील सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी जालिंधर बुधवत यांची तर उपाध्यक्षपदी शालिग्राम वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे

बुलडाणा तालुक्यातील धाड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष/उपाध्यक्ष पदाची आज दि २४/३/२०२२ रोजी निवडणूक पार पडली. धाड सहकारी संस्थेच्या अंतर्गत धाड, बोरखेड, सोयगाव, वरुड, टाकळी, करडी, सावळी, ढालसावंगी अशी आठ गावे येतात. त्यामुळे ही सहकारी संस्था तालुक्यातील मोठी व प्रतिष्ठेची सहकारी संस्था मानल्या जाते. या सहकारी संस्थेचा तसेच संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधव यांच्या हितावह चांगली विकास कामे करता यावी या दृष्टीकोनातून सर्वानुमते शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची अध्यक्षपदी तर सावळी येथील शालिग्राम वाघ यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच संचालक गणेश बाजी, रामकृष्ण जाधव, नंदकुमार खडके, साहेबराव मोहिते, सईद खाँ अजीज खाँ, सौदागर अन्नू नूरमोहम्मद, श्रीरंग एंडोले, महेंद्र बोर्डे, नजोमुद्दिन ताजोद्दिन, तुळसाबाई खांडवे, प्रमिला वाघूर्डे, यांच्यासह धाड परिसरातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here