काँग्रेसने टाळ मृदंग वाजवुन केले “महागाईचा विरोध
देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळं सर्वसामान्यांना जनतेला महागाईचा मोठा फटका बसत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने बुलडाणा येथे अनोखे आंदोलन केले
खाद्यतेलाचे भाव 180 रुपये लिटर, पेट्रोल एकशे 20 रुपये लिटरच्या जवळपास आणि डिझेल शंभरी पार केली आहे एकंदरीत देशात महागाई वाढत चालली आहे सर्वसामान्य व्यक्तींना जीवन जगणे कठीण होत चालले आहेत याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने बुलडाणा येथे टाळ मृदंग वाजवीत ‘महागाई मुक्त भारत’ आंदोलन केले आहे. देशात वाढत चाललेली महागाई आटोक्यात आणण्याच्या दृष्टीकोनातून सरकाराने तात्काळ प्रयत्न करावे या दृष्टिकोनातून लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस सप्ताहभर वेगवेगळे आंदोलन करणार आहे आज टाळ-मृदंग बाजून या महागाईच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केला आहे