आमदार देवेंद्र भोयर यांची स्वाभिमानीतुन हकालपट्टी = राजू शेट्टी

0
276
  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भोयर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलडाणा येथे केली आहे
  • आज 25 मार्च रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे बुलढाणा येथे आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमदार देवेंद्र भोयर हे विधिमंडळामध्ये आवाज उठत नसून ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बिल्याने त्यांना विधिमंडळाला पर्यंत पोहोचवलं त्या संघटनेच्या बिल्याची त्यांना आता लाज वाटत आहे असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील आमदारांना मोफत घरे देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच घोषणा केली आहे या घोषणेनेवर राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप नोंदवत पहिले सर्वसामान्य लोकांना मोफत घरे द्या आणि नंतरच लोकप्रतिनिधींना द्या.. तेही घरे त्यांना काही माफक दरात द्या असेही राजू शेट्टी यांनी सांगितले याशिवाय घरगुती गॅस डिझेल पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे याकडे केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली
    कश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी बोलतांना ते म्हणाले की हा चित्रपट पाहत असतांना ज्या शेतकरी पुत्राने हताश होऊन पंढरपूर येथे आत्महत्या केली. त्या व्यक्तीची क्लिप पहा शेतकऱ्यांची दहकता ही सरकारला समजेल टोला त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मारला….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here