मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये गझल गायकी कार्यक्रम संपन्न
बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज मध्ये गझल गायकी या कार्यक्रमाचे आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचालित बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज मधील उर्दू विभागाच्या वतीने गझल गायकी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ केदार ठोसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभागप्रमुख चंद्रशेखर भांदतकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उर्दू विभाग प्रमुख फिरदोस अंजुम यांनी केलं या वेळी व्यासपीठावर प्राध्यापक मोहम्मद अर्शद प्रा मयोद्दीन ताजी उपस्थित होते यावेळी मॉडेल डिग्री कॉलेज मधील विद्यार्थी 15 विद्यार्थानी गजल सादर केल्या या कार्यक्रमादरम्यान शायर ए मशरीक डॉक्टर अल्लमा इकबाल यांच्या जीवन चरित्रावर विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या हस्तलिखीत पुस्तंक संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सकिना बी आणि कु साईमा परवीन यांनी केलं या कार्यक्रमाला मॉडेल डिग्री कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक उपस्थित होते