शिवसेना नेते खा संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर शिवसेना आक्रमक झाली असून याकारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेने निदर्शने करत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन ही शिवसेनेने केले …. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आय एन एस विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला हा निधी राजभवनामध्ये जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं परंतु अद्याप पर्यंत हा निधी राजभक्नाला प्राप्त झाला नाही असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी बुलढाणा जिल्हा शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे जोपर्यंत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना आंदोलनात्मक भूमिका सुरू ठेवेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]