0
89

गण गण गणात बोते च्या गजरात दुमदुमली पंढरी , आषाढी एकादशी निमित्त शेगावात भाविकांची दर्शनासाठी गर्दी…

 

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी जमली… तर जे भाविक पंढरपूर ला जावू शकत नाहीत, त्यांनी संत गजाननांच्या नगरीत येवून महारांजाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय … या दर्शनाला पंढरपूर च्या विठ्ठलाच्या दर्शनाचेच महत्व असल्यामुळे आज आषाडी निमित्ताने संत नगरी शेगावात लाखो भाविक येत असतात .. काल सायंकाळी पासुनच राज्यातून लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून शेगाव ला प्रति पंढरपूर म्हणून ही ओळखल्या जातेय … तर महाराजांचा पालखी सोहळा ही सायंकाळी मोठ्या आनंदात पार पडनार आहे.. .. रात्रीपासून शेगांव सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, मात्र भाविकांनी शेगावात महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केलीय.. मंदिरात सकाळपासून विविध कार्यक्रम पार पडले, तर आजचा सर्वात महत्वाचा कार्यक्रम ह पालखी सोहळा सायंकाळी होणार असून मंदिरात आतल्या आत होणार आहे .. त्यामुळे हा सोहळा भाविकांना अनुभवता येणार नाही .. मात्र गर्दीने शेगांव फुलले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here