बुलडाणा ( प्रतिनिधी)
बुलढाणा जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने संघटनात्मक बांधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे . उबाठा शिवसेना गटाच्या वतीने ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच सत्र सुरु करण्यात आल असुन कार्यकर्तामध्ये जोश निर्मितीच काम सुरू हाती घेण्यात आल आहे . आज मोताळा तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उबाठा शिवसेना गटाचे संपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या उपस्थितीत होते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करावं या दृष्टिकोनातून या दोन्ही नेत्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली..आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्यात काल बुलढाणा येथे व आज मोताळा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने बैठका घेऊ संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली.. आगामी काळात पक्षांची रणनीती बुथ कमिट्यांच्या कार्यकर्त्यांचं काम याविषयी चर्चा करण्यात आली असुन या बैठकीला उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी होते ….