- बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील सोनाजी महाराजांचा यात्रा महोत्सव गोविंदा गो-विंदा नामघोषात रथमोत्सव साजरा..121 क्विंटल ज्वारीच्या महाप्रसादाने भक्तांनी घेतला लाभ.
बुलडाणा ( प्रतिनिधी )
बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराजांचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला गोविंद गोविंद नामघोषात करत रथ उत्सव पार पडला… झेंडूची फुले वर रेवढी दहीकाल्याच्या उधळीत यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला ….
या उत्सवासाठी परिसरातील तसेच बुलढाणा,अकोला,अमरावती , मध्यप्रदेश राज्यातील हजारो भाविक-भक्त मोठया संख्येने उपस्थितत होते…
-
गोविंदा गोविंदा च्या गजरामध्ये श्री संत सोनाजी महाराजांच्या रथ उत्सवला २८ नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजता पासून सुरुवात झाली
संपूर्ण गावांमधून रथ उत्सव काढण्यात आला .. संत सोनाजी महाराजच्या जल्लोषात संपूर्ण सोनाजी नगरी दुमदुमली होती . यामध्ये हजारो भाविकांनी नवसाचे नारळाचे तोरण व झेंडूची फुले रथावर बांधली ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. यामध्ये तीन मजली रथाला नारळ व झेंडूची फुले आणि झेंडूची झाडांनी व चमकीच्या रेबीन ने संपूर्ण रथ हा सजवला गेल्या होता .
श्री संत सोनाजी महाराज नगरीमध्ये प्रत्येक घराच्या समोर अंगना मध्ये रांगोळ्या काढून भक्तिभावाने रथाचे पूजन करण्यात आले तसेच या रथ उत्सवा करिता परिसरातील अनेक गावागावातून आलेल्या भजनी दिंड्या , टाळ मृदंग ,सह सहभागी झाल्या होत्या त्यानंतर संत सोनाजी महाराजाची
महाआरती करण्यात आली व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले होते .