वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने करणेसाठी लाखो भाविक येणार शेगावला
बुलडाणा ( प्रतिनिधी ) विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांचे मंदिर आज 31 डिसेंबर रोजी रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे .. आज वर्षाचा शेवटचा दिवस असून तर नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो भाविक शेगावात आज सायंकाळ पासून गर्दी करत असतात .. त्यामुळे येणाऱ्या
भाविकांची वाढती गर्दी पाहता, गैरसोय टाळण्यासाठी यावर्षी देखील संत गजानन महाराज शेगाव संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे .. दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करत असतात.. त्यामुळे संतनगरी शेगावमध्ये आज आणि उद्या 1 जानेवारीला भक्तांची मांदीयाळी पहावयास मिळते या पार्श्वभूमीवर शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने 31 डिसेंबरला रात्रभर गजानन महाराजांचे मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे ..