सावित्रीबाईच्या जयंतीचं औचित्य साधुन विधवा घटस्फोटीत महिला चा पुर्नविवाहसाठी झाला साखरपुडा संपन्न ..

0
332

 

बुलढाणा( प्रतिनिधी ) मुलगा मुलगी यांच्यात भेद न करता मुलीना शिक्षीत करून तीला शैक्षणीक दृष्ट्या सक्षम करा .. म्हणजे ती स्वतःह निर्णय घेण्यास स्वयंभु होतील असे प्रतिपादन भाजपा महीला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार श्वेताताई महाले यांनी व्यक्त केलंय

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच औचित्य साधुन विधवा घटस्फोटीत महिलाच्या पुर्नविवाहसाठी परिचय मेळाव्याच आयोजन 3 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे करण्यात आल होत यामेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुप्पमाला भाजपाच्या महिला प्रदेशउपाध्यक्ष तथा आमदार श्वेताताई महाले यांनी अर्पन करून केली.
विधवा, घटोस्फोटीत, परित्याक्ता महिला, विधुर व घटोस्फोटीत पुरुष यांना सुद्धा अनुरुप जोडीदार मिळणे हक्क आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी सुद्धा त्यांचे दत्तक पुत्र यशवंत याचा विवाह विधवा महिलेसोबत लावून त्या काळात क्रांतीचे बीज रोवले.. या कार्याला पुढे नेण्यासाठी बुलडाणा येथील मानस फाउंडेशन यांच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते … प्रास्ताविकात प्रा दत्तात्रय लहाने यांनी विधवा , घटस्फोटीत महिला च्या व्यथा यावेळी मांडल्या. महीलांच्या परितक्त्या, विधवा विधुर घटस्फोटीत पुरुष महिलांचा लग्न होण्याच्या दृष्टीने परिचय कार्यक्रमदरम्यान घेण्यात आल्याच त्यांनी सांगितले . तर विधवा पुर्नविवाहाला शासनस्तरावर अनुदान मिळावं अशी मागणी प्रा दत्तात्रय लहाने यांनी वेळी केली . या कार्यक्रमा दरम्यान दोन विधवा महिलांच आणि पुरुषाच पुर्नविवाहसाठी साखरपुडा यावेळी सर्वाच्या साक्षीने पार पडला. यावेळी विधवा, घटस्फोटीत परितक्त्या विदुर पुरुष उपस्थित होते …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here