सिदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी करण्यात आलं पूजन…जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी
- वुलडाणा ( प्रतिनिधी ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 426 वी जयंती …राष्ट्रमाता जिजाऊच जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात आज जिजाऊ जन्मउत्सव सोहळा पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला झाला होता… जिजाऊ जन्मउत्सव सोहळया निमित्य राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि राष्ट्रमाता जिजाऊंच जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आली आहे…
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी नागरीक येत आहेन … सकाळीच राजे लखोजी जाधव यांचे वंशज यांनी राजमाता जिजाऊची आरती केली आणि जिजाऊ वंदन केले त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतिश बाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केल्या गेला
सकाळपासुनच राज्यातील विविध जिल्हयातुन नागरीक जिजाऊच्या चारणी नतमस्तक होऊन आभिवादन करत आहे त्यामुळे सिदखेडाराजा येथे मोठया प्रमाणात गर्दी झाली आहे…