एका तलाठी सावित्रीने गावकरी महिलांना “सावित्रीबाईचा सत्यशोधक ” चित्रपट दाखवुन फेडलं समाज ऋण …
बुलडाणा (प्रतिनिधी )
सत्यशोधक या चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचे जीवन कार्य चित्रपटाच्या माध्यमातून का होईना महिलांना कळावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील पहिली महिला तलाठी असलेल्या मंगला सवडतकर यांनी आपल्या सावरगाव डुकरे या गावातील महिलांसाठी चिखली येथील सिनेमागृहात संपूर्ण शो बुक करून महिलांना हा चित्रपट दाखवला आहे..
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यामुळे आज महिला सन्मानाने जगत आहेत, त्यांच्या प्रति उतराई म्हणून मंगला सवडतकर यांनी हा उपक्रम राबवला आहे…