विवेकानंद जन्मोत्सवची सांगता महाप्रसादाने…. 50 एक्करावर बसलेल्या महापंगतीला 150 ट्रॅक्टर आणि 2000 स्वयंसेयकाच्या सहाय्याने वितरित करण्यात आलं भोजन
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे विवेकानंद जयंती उत्सवाची सांगता 2 फ्रेबुवारीला महाप्रसादाने झाली .. 250 क्विंटल पुरी आणि 150 क्विंटल वांग्याच्ण भाजीचा महाप्रसाद एकाच वेळी 50 एकर शेतात बसलेल्या नागरिकांना 150 ट्रॅक्टरच्या सहाय्याने 2 हजार स्वंयसेवकांनी वाढण करून महापंगतीला भोजन वितरित केल…
स्वामी विवेकानंद यांच्या रथाने 50 एकरात बसलेल्या महापंक्तीच्या मधोमध भ्रमण केलं यावेळी नागरिकांनी या रथावर पुष्प उधळून स्वामीजींना अभिवादन केले त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं
श्लोक म्हणून नंतर महापंगतीतील नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला …या महापंगतीत महिला आणि पुरुषांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती स्वामी विवेकानंद जयंती उत्सवाची सांगता महाप्रसादाने करण्याची हिवरा आश्रम येथील 60 वर्षाची परंपरा आजही जपल्या जात आहे या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला राज्यभरातून नागरिक येत असतात…
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या महाप्रसादाचा आनंद लाखो भाविकांनी घेतला. एकाच वेळी एकाच छत्राखाली एकाच वेळेला सर्वजण भोजन करणाऱ्या या महापंक्तीची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणे गरजेचे आहे . विशेष म्हणजे महापंगत संपल्यानंतर कुठेही अन्न उष्ट पडलेलं किंवा पत्रवाळीचा कचराही परिसरात दिसत नाही. कारण महापंगत झाल्यानंतर स्वयंसेवक संपूर्ण पन्नास एकराचा परिसर स्वच्छ करतात ही या पंक्तीची वैशिष्ट्य आहे..