उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेने बुलडाणा जिल्हाकचेरी समोर दिले धरणे
बुलडाणा प्रतिनिधी
उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 24
फेब्रुवारीच्या पुरवणीनुसार अनुदानाचा आदेश निर्गमीत करून पगार सुरु करण्यात यावा, अघोषीत उच्च माध्यमिक शाळा घोषीत करुन आर्थीक तरतुद करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज १४ रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र रज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार 13 सप्टेंबर 2019 नुसार घोषीत व अनुदान मंजूर उच्च माध्यमिक विद्यालयाला २४ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुर पुरवणी मागणीद्वारे 106 कोटी 74 लाख 72हजार रुपये मंजुर असलेला निधी तात्काळ वितरीत करण्यासंदर्भात शासन आदेश
निर्गमीत करण्यात यावा, तसेच मागील अठरा वषार्पासून विना वेतन वेठबिगारीचे जीवन जगणाºया शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मंजुर असुन त्यांना तो देण्यात येत नाही, हा विनाअनुदानीत शिक्षकांवर अन्याय आहे. नुसत्या तपासणीच्या नावाखाली वितरणाचा आदेश निर्गमीत केला जात नाही.
तरी तपासणी अहवालाच्या अधीन राहुन याच अधिवेशनात निधी वितरणाचा आदेश देण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात मोहन शैदाळे, पुरुषोत्तम किलबिले, प्रदीप खर्चे, रविंद्र रावणचौरे, गौतम वाकोडे, विनोद गवई,
इमरान, सतिष गावंडे, अरुण खरात, बाळकृष्ण इंगोले, पुरुषोत्तम सपकाळ, गजानन मुळे, सुनिल बिलारी, गजानन निकम यांच्यासह असंख्य शिक्षक सहभागी
झाले होते.