**कृषी विधेयक संदर्भात जनजागृती करण्यासाठी भाजपा घेणार शेतकरी मेळावे आणि चर्चासत्रे …. भाजपा प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी दिली माहिती*
बुलढाणा प्रतिनिधी
केंद्र सरकारने घेतलेले कृषी विषयक विधेयक हे शेतकरी हिताचे आहे यावर आम्ही ठाम आहोत या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्य जीवनामध्ये अमुल्यग्रह बद्दल होणार आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे अजुनी कोणत्याही शेतकऱ्याला या कायद्याविषयी अडचण वाटत असेल तर त्यांचं निरसन आम्ही करण्यास तयार आहोत असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी बुलढाणा येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली
केंद्र सरकारने पारित केलेले कृषी धोरण रद्द करावा या संदर्भात विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पारित केलेले विधेयक हे शेतकरी हितासाठी आहे या विधेयकातील माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि जनतेला समजून सांगण्यासाठी भाजपाच्या वतीने शेतकरी मेळावे चर्चासत्रे आयोजित करून शेतकऱ्यांमध्ये जनजागरण करण्यात येणार असल्याचेही भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बुलढाणा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली
शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करून त्यांची दिशाभूल करण्याचे काम काही राजकीय नेते करीत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यापुढेही धान्याची खरेदी ही चालू राहणार आहेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे तसे लेखी आश्वासनही केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले सध्याची बाजार समितीची व्यवस्थाही भविष्यामध्ये कायम राहणार असून शेतकऱ्यांना बाजार समिती बरोबरच आपल्या शेतमालाच्या विक्रीचा आणखी एक पर्याय या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार आपला शेतमाल कुठेही शिकण्याची मुभा या करारामध्ये नमूद करण्यात आले आहे सोबतच कॉन्ट्रॅक्ट शेतीबाबतचे गैरसमज केंद्र सरकारच्या वतीने दूर करण्यात आले आहे परंतु हा कायदा रद्द करा या मागणीवर संघटनेचे नेते अडून बसले आहेत या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचा आहे असा आरोपही यावेळी त्यांनी केला या आंदोलनामध्ये दंगे घडणाऱ्या आरोपींचे आणि शहरी नक्षलवादी म्हणून कैदेत असलेल्या लोकांचे पोस्टर्स धडकले यावरून हे आंदोलन शेतकऱ्यांचे राहिली नसून हे आंदोलन माओवाद्यांनी हायजॅक केल्याचा असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला या पत्रकार परिषदेला माजी आमदार विजयराज शिंदे भाजपा किसान आघाडीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते