*शेतकऱ्यांच्या_सरसकट पिक विम्यासाठी शिवसेना-युवासेना आक्रमक*
मेहकर प्रतिनिधी
खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मूग,उडीद व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते पंरतु शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पिक विम्याचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी मेहकर कृषी कार्यालयामध्ये शिवसेना युवा सेनेच्या वतीने घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला
पेनटाकळी प्रकल्प व कोराडी प्रकल्प हा शंभर टक्के भरला असल्यामुळे या दोन्ही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या १७ गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव व शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश वाळुकर यांनी मेकर कृषि विभागाच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरसकट पीक विमा देण्यात यावा,अशी आग्रही मागणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव सुरेश तात्या वाळुकर यांनी करत उपस्थित शेतकऱ्यांना धिर दिला
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]