पत्रकार संजय मोहिते यांना राज्यस्तरीय झेप पुरस्कार प्रदान
बुलडाणा( प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार तथा बुलडाणा लाईव्ह चे संपादक संजय मोहिते यांना आज हिवरा आश्रम येथे पार पडलेल्या झेप साहित्य संमेलनात राज्यस्तरीय हरणाबाई जाधव झेप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,*
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे आज 20 डिसेंम्बर रोजी झेप चे दहावे संमेलन उत्साहात पार पडले, याप्रसंगी संमेलनाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विचारवंत तथा साहित्यिक डॉ, विनायक तुमराम, स्वागताध्यक्ष शिवाजी घोंगडे, झेप परिवाराचे सर्वेसर्वा डी, एन, जाधव,उदघाटक ऍड, अनंतराव वानखेडे, निमंत्रक प्राचार्य पंढरीनाथ शेळके, विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर, बी, मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, प्राचार्य एम,डी, कड ,सरपंच निर्मला डाखोरे उपस्थित होते, यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्धल 9 मान्यवरांचा झेप पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला, यामध्ये पत्रकारितेतील कामगिरीबद्धल संजय मोहिते यांना सन्मानित करण्यात आले, संजय मोहिते हे गत 25 वर्षांपासून
या क्षेत्रात कार्यारत असून त्यांनी आजवरच्या काळात लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, लोकमत, पुण्यनगरी आदी नामवंत वृत्तपत्रात काम केले आहे, काश्मीर समस्येवर आधारित त्यांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे