बुलडाणा कोरोना अलर्ट : प्राप्त 267 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 54 पॉझिटिव्ह*

0
62

*बुलडाणा कोरोना अलर्ट : प्राप्त 267 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 54 पॉझिटिव्ह*
• 9 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा दि. 5 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 321 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 267 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 54 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 50 रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 170 तर रॅपिड टेस्टमधील 97 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 267 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव तालुका : जळका तेली 1, पि. राजा 1, सुटाळा 2, बोरी अडगांव 1, नांदुरा तालुका : निमगांव 1, खामगांव शहर : 7, दे. राजा शहर : 4, चिखली तालुका : वाघोरा 1, नायगांव 1, वाघापूर 1, चिखली शहर : 13, सिं. राजा तालुका : पळसखेड चक्का 1, लोणार शहर : 2, लोणार तालुका : भुमराळा 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : खरबडी 2, पिं देवी 1, बुलडाणा शहर : 6, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : जानेफळ 1, जळगांव जामोद शहर : 3, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 54 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान हेडगेवार हॉस्पीटलजवळ चिखली येथील 70 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 9 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 3, बुलडाणा : अपंग विद्यालय 5, सिं. राजा : 1.
तसेच आजपर्यंत 92055 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12260 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 12260 आहे.
तसेच 672 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 92055 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12779 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 12260 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 366 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 153 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here