आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठा सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा विश्वभूषण मराठा पुरस्कार जाहीर
बुलडाणा{ प्रतिनिधी }
राज्यात कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत केली असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी दिली आहे
मातृतीर्थ बुलडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा येथे मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊ सृष्टीवर भव्य असा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो शिवधर्मविचारपीठावरून वैचारिक देवाण-घेवाण ही केली जाते याशिवाय विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यावर्षीचा मराठा विश्वभूषण पुरस्कार कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांना या वर्षीचा मराठा विश्वभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे 12 जानेवारीला जिजाऊ सृष्टी येथे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम साजरा होणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश लोखंडे यांनी दिले