गुटखा विक्री किवा साठवणुक करणाऱ्याविरुध्द कलम 188 व 328 लावण्याचा मार्गमोकळा …अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ राजेद्र शिगणे
बुलडाणा प्रतिनिधी
अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 लावण्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे त्यामुळे अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली सोबतच अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यासंदर्भात चा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला असून लवकरच यासंदर्भात निर्णय होईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 कलम लावण्यात येत होती परंतु काही गुटका व्यापाऱ्यांनी या संदर्भाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल दिला होता या निकालाच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनान विभागाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती 7 जानेवारी 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारची बाजू ऐकून घेत औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे त्यामुळे आता राज्यांमध्ये अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 188 सोबतच कलम 328 लावला जाणार आहे त्यामुळे अवैधरीत्या गुटखा विक्री करणा-यांची मुस्के आवळे जाणार आहे सोबतच राज्यात गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात संदर्भात प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून यासंदर्भात चर्चा सुरु आहे अशी माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिली
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]