*बुलढाणा जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीच्या 3891 जागांचे निकाल जाहीर …..प्रत्येक राजकीय पक्ष करतोय 80 ते 90 टक्के उमेदवार निवडून आल्याचा दावा…. दावे प्रतिदाव्यांनी कनफ्यूज वातावरण*
बुलडाणा ( प्रतिनिधी )
ग्रामपंचायतीचे निकाल लागले परंतु वर्चस्व कोणाचे या वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षाचे नेते दावे-प्रतिदावे करत असल्यामुळे आपण भाऊ.. दादा की साहेबांचे समर्थक आहोत हे कनफ्यूज करणारे ठरत असून राजकीय नेते मात्र 80 ते 90 टक्के उमेदवार आपलेच असल्याचा दावा करीत आहे प्रमुख चार राजकीय पक्षाचा विचार केला असता वर्चस्वाच्या या लढाईत प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा तीन पटीने भर आहे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये 527 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर उर्वरित 498 ग्रामपंचायतीच्या 3891 सदस्य निवडीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले त्यानंतर 18 जानेवारीला सकाळी नऊ वाजल्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली पहिले बैलेट पेपर आणि नंतर ईव्हीएम मशीन मध्ये पडलेले मतदानाची मोजणी झाली .
निवडून आलेल्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विजय जल्लोष साजरा करीत असतानाच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्यक्ष सहभागी न झालेले राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात मात्र आपल्या सोयीनुसार बाहेरगावी किवा दौऱ्यावर होते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचार किंवा जाहीर बैठका घेण्याचे त्यांनी टाळले . मात्र निवडणुकीचा निकालानंतर श्रेय घेण्याच्या वर्चस्वाच्या लढाईत ते दिवसभरात कामाला लागले होता निवडून आलेले सर्व सदस्य हे आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा करीत होते प्रत्येक राजकीय पक्ष नेते 80 ते 90 टक्के आपलेच उमेदवार विजयी झाल्याचा दावा करत आहे प्रत्यक्ष निवडणुकीत निवडुन असलेले उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या दाव्यांची गोळा बेरीज केली निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या तब्बल तीन पटीने वाढेल.. एवढे मात्र निश्चित