*बुलढाणा जिल्ह्यातील सहा केंद्रावरून कोरोना लसीकरणाचे काम सुरूच ….आज 19 जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत 339 कोरोना योद्ध्यांना दिली लस…..*
बुलडाणा प्रतिनिधी
– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोव्हीशिल्ड लस ही आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टर अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सहा केंद्रावर लसीकरण करण्यात येत असुन आज 19 जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत 339 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली
बुलडाणा जिल्ह्यात लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 16 जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर त्यादिवशी 565 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली ही लस सध्या फ्रंट लाईन कोरोना योध्याना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. आज 19 जानेवारीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी लस घेतली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन त्यांनी लस टोचून घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून आपल्या आरोग्यासाठी आणि कोरोनापासून बचावासाठी सगळ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले..
बुलढाणा जिल्ह्यातील सहा केंद्रावर कोरोनाची लस दिल्या जात आहे आज 19 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 339 आरोग्य कर्मचाऱ्यांनी करून घेतली यामध्ये बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये केंद्रावर 18 , चिखली ग्रामीन रुग्णालय केंद्रावरून 57 देऊळगाव राजा आरोग्य केंद्र वरून 70 ,खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालय केंद्रावरून 83 ,मलकापूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून 41, शेगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयातून 70 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस टोचून घेतले