अवैध गुटखा साठ्यावर छापा; 35 लाखांचा गुटखा जप्त…
बुलडाणा:- बुलडाणा जिल्हयातील खामगाव येथील डि.पी रोडवरील राघव संकुलातील 3 व 4 क्रमांकाच्या गळ्यामध्ये अवैधरित्या साठविलेल्या प्रतिबंधीत गुटखा साठ्यावर बुधवारी मध्यरात्री अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी छापा मारून यावेळी 35 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
राज्यात गुटका, मावा, पानमसाला व तत्सम तंबाखुजन्य पदार्थाचे उत्पादन, साठा, वितरण व विक्री या वस्तुवर प्रतिबंध घातलेला आहे. राज्याचे अन्न औषधी प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषधी प्रशासन कार्यालयाने सातत्याने प्रतिबंधीत अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करीत आले आहे.खामगाव येथील अजय सिध्दार्थ खंडारे यांच्या डि.पी रोडवरील राघव संकुलातील 3 व 4 क्रमांकाच्या गळ्यावर बुधवारी रात्रीच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांनी छापा मारून 35 लाखांचा गुटखा जप्त करून अजय सिध्दार्थ खंडारे यांच्याविरुध्द अन्न सुरक्षा मानदे कायदा अन्वये खामगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
-35 लाख 67 हजार 50 रुपयांचा किंमतीचा गुटखा साठा जप्त करुन केले सिलबंद-
नजर प्रिमियम गुटखा 30 लाख 60 हजार रुपये, गोवा 1000 गुटखा 4 लाख 32 हजार रुपये, आर जे पानमसाला 71 हजार 500 रुपये व आर ओ सुगंधीत तंबाखु 550 रुपये, असा एकूण 35 लाख 67 हजार 50 रूपये किंमतीचा साठा जप्त करुन सिलबंद करण्यात आला…