मराठा अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर मारहाणीचा आरोप,पोलिसात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद..

0
131

मराठा अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षासह तिघांवर मारहाणीचा आरोप,पोलिसात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद..

बुलडाणा येथील मराठा अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्ष श्रीकृष्ण जेऊघाले यांच्यावर व त्यांच्या आई-वडीलांवर शेताच्या धुऱ्याच्या वादातून मारहाण केल्याचा आरोप वरवंड येथील शेतकरी संदिप जेऊघाले यांनी केला असून बुलडाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली आहे.प्रकरणी पोलिसांनी श्रीकृष्ण जेऊघाले व त्यांच्या आई वडिलांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

तक्रारकर्ता संदीप जेऊघाले यांचे म्हणणे आहे की,माझ्या आइचे नावे ग्राम वरवंड शिवारात गट क्र 152 मधे चार एकर शेत असुन आमचे शेता शेजारी मराठा अर्बन पतसंसतेचे अध्यक्ष रूस्तुम सदाशिव जेउघाले यांचे शेत असुन ते नेहमी शेतातील घुऱ्याच्या कारणावरून आमचे सोबत वाद घालीत असतात.19 जानेवारीच्या सकाळी 10.30 वा दरम्यान मी वरवंट माझ्या शेतात स्पिंक्लर सेट बदलण्यासाठी गेलो असता माझ्या शेता शेजारील शेताचे मालक मराठा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकष्ण रूस्तुम जेउघाले त्यांचे वडील रूस्तुम सदाशिव जेउघाले व त्यांची आई प्रमीला रूस्तुम जेउघाले हे माझ्या शेतातील धुयावर दगड व माती टाकीत होते म्हणुन मी त्यांना आमचे धुऱ्यावर दगड व माती टाकु नका असे म्हटले असता श्रीकष्ण जेऊघाले व रूस्तुम जेउघाले यांनी मला चापटा बुक्यांनी मारहाण केली व तिघांनी मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.याबाबत तक्रारकर्ता संदीप जेऊघाले यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 323,504,506 व भादवी 34 नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here