मादणी येथील शेतात आढळले दहा जंगली बदके मृत …बदकाचा मृत्यू बर्ड फ्लू ने की कश्याने ? अहवाल आल्यावर समजणार*

0
124

*मादणी येथील शेतात आढळले दहा जंगली बदके मृत …बदकाचा मृत्यू बर्ड फ्लू ने की कश्याने ? अहवाल आल्यावर समजणार*

 

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगांव पासून जवळच असलेल्या ग्राम मादणी येथील धरणा जवळ शेत असलेल्या प्रदीप भुजनागराव मेटांगळे यांच्या शेतात १० जंगली बदके मृत अवस्थेत सापडले ज्याची माहिती पशुधन विभाग यांना कळताच यांनी शेतात येऊन मृत पक्ष्यांचा पंचनामा करून बदके कश्याने मृत्यू पावले याचा शोध घेण्या साठी मृत बदकाचा सॅम्पल पुण्याच्या लॅब मध्ये पाठवणार अहवाल आलतावर कळणार ते बदक बर्ड फ्लूने की कश्याने मृत झाले.

एकीकडे बर्ड फ्लूने देशात अलर्ट असतांनाच दुसरीकडे मादणी येथून जवळच असलेल्या मेटांगळे यांच्या शेतात २४ जानेवारीच्या सकाळी १० जंगली बदके काही जिवंत तर काही मृत अवस्थेत मिळून आले ज्यांच्या तोंडातून फेस येत होता याची माहिती गावकऱ्यांच्या कडून पशुधन अधिकारी यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बदकाची पाहणी केली पशुधन अधिकारी येई पर्यत कुत्र्यांनी त्याठिकाणावरून सहा बदके पळविली होती या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फक्त चारच बदके मिळून आली तेव्हा बदकाचा मृत्यू कश्याने झाला याचा तपासलावण्यासाठी पशुधन अधिकारी यांनी बदकांचा सॅम्पल अकोला येथील लॅबच्या मार्फत पुणे येथे पाठवला आहे हा अहवाल आल्यानंतरच कळणार आहे की त्या जगली बदकांचा मृत्यू बर्ड फ्लूने की विषाने झाला दरम्यान मेहकरचे पशुधन अधिकारी ज्ञानेश्वर देशमुख,एस आर गायकवाड पशुधन पर्यवेक्षक हिवरा आश्रम,बोचरे परिचारक घटनास्थळी जाऊन या संदर्भात पंचनामा केला तर शेतकऱ्याच्या मदतीने खड्डा खोदून मृत पक्ष्याला गाडून अंत्यविधी केलाय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here