जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली 6 व्यापाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई;
बुलडाणा जिल्हयात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन आपली प्रतिष्ठाने चोरुन उघडी ठेवणाऱ्यां बुलडाणा शहरातील सहा व्यापाऱ्यांविरुध्द आणि विना मास्क रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यां नागरिकांविरुध्द नगर पालिका प्रशासन महसुल विभाग व पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमान दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बुलडाणा शहरातील या सहा व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात विविध पथकांची नेमणूक करुन ही कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव दिवसागणीक वाढत चालला आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात
येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या भागामध्ये जास्त आहे. अशी
जिल्ह्यातील सर्वच नगर परिषद क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये घोषीत केले आहेत. या प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये नागरीकांनी सतर्क राहून आदेशाचे पालन करावे, अशी अपेक्षा असतांनाच या प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची प्रतिष्ठाने केवळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासंदर्भात मुभा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे मात्र बुलडाणा शहरामध्ये काही दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने अर्धवट सुरु ठेवून नेहमीप्रमाणे दुकानदारी सुरु ठेवली होती. दरम्यान नगर पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेत महसुल् विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने शहरात विविध पथके तयार केली व चोरीच्या मार्गाने
आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यां शहरातील पार्वती ट्रेडर्स, महाविर आईस्क्रीम पार्लर, चंद्रकला झेरॉक्स, राजमुद्रा ऑनलाईन सेवा केंद्र, शाम मशनिरी सुविधा रेडीमेट यांना प्रत्येकी 5
हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या शिवाय शहरामध्ये विनाकारन विना मास्क फिरणाऱ्यां नागरीकांवरसुध्दा 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. बुलडाणा शहरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशानंतर तिन दिवसात जवळपास 1 लाखाचा आणि आज 50 हजार रुपये दंड प्रशासनाने नियमाची पायमल्ली करणाऱ्यां व्यक्तींकडून वसुल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यां व्यापाऱ्यांविरुध्द प्रथम 5 हजार रुपये दंड, दुसऱ्यांवेळी 25 हजार रुपये व तिसऱ्यांवेळी हिच दुकान उघडी दिसल्यास हे दुकान सिल करण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा नगर परिषद मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली आहे
*Yuwaraj wagh buldana*