राज्याला दुसऱ्या टप्यात मिळणार 8 लाख 9 हजार 500 रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा,डॉ.शिगणेंची माहिती.*

0
68

*राज्याला दुसऱ्या टप्यात मिळणार 8 लाख 9 हजार 500 रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा,डॉ.शिगणेंची माहिती.*

: :- केंद्र सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शनचे बाबतीचे धोरण आपल्या हातात घेतल्यानंतर 21 एप्रिल पासून तर 30 एप्रिल पर्यंत 2 लाख 68 हजार व नंतर 4 लाख 35 हजार देण्यात आले होते.मात्र आता अन्न औषध प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर आता 21 एप्रिल ते 9 मे पर्यंत 8 लाख 9 हजार 500 रेमडिसीविर इंजेक्शनचा साठा राज्याला केंद्राकडून पुरविला जाणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाचे मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.शिवाय पुढच्या काळात राज्याला रेमडीसीविर इंजेक्शन वाढवून देण्याची राज्य शासनामार्फत मागणी केंद्र सरकारला केली आहे असे ते म्हणाले

महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधित ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 लाखाच्यावर गेली आहे,आणि ही रुग्ण संख्या 7 लाखाच्यावर गेल्यामुळे महाराष्ट्र आरोग्य व्यवस्थेवर एक फार मोठा ताण येतोय.असे सांगत राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, विशेषता ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये आणि रेमडेसीवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग हा मागील काही दिवस अतिशय जागरूक राहून राज्यांमधील गरजूंना ऑक्सिजन मिळाला पाहिजे आणि रेमडेसीवीर इंजेक्शन मिळायला पाहीजे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहत आहे
आपल्या राज्यात प्रतिदिवस जवळपास साडेबाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन आपण आपला स्वतःचा तयार करतो. आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध भागातून ऑक्सिजनच्या मिळतो, गुजरात,भिलाई छत्तीसगड,बेल्लारी कर्नाटक, हैदराबाद तेलंगणा या भागातून आपण मिळवण्याचा प्रयत्न करतोय.कालपर्यंत 1 हजार 736 मेट्रिक टन ऑक्‍सिजन आपण वितरित करण्याचा प्रयत्न केल्याचे डॉ.शिंगणे म्हणाले.

 

*Yuwaraj wagh buldana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here