*गौण खनिज रायल्टी पोटी तब्बल 82 कोटींची वसुली! दुष्काळात शासकीय तिजोरीत मोलाची भर
बुलडाणा = शासकीय तिजोरीत ठणठणाट असताना व कोरोनविरुद्धच्या लढ्या मुळे निधीचा तुटवडा असताना गौण खनिज रॉयल्टी पोटी जिल्ह्यातून तब्बल 81 कोटीच्यावर वसुली करण्यात आली, यामुळे शासकीय तिजोरीत मोलाची भर पडली आहे, *
गौणखनिज स्वामीत्वधन संकलन अंतर्गत जिह्याला सन 2020- 21 या आर्थिक वर्षात 93 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते, कोरोना विरुद्धच्या लढ्यात महसूल यंत्रणा गुंतल्या आहे, तसेच मध्यंतरी मोठ्या संख्येने ग्राम पंचायत निवडणुका पार पडल्या, याशिवाय दैनंदिन कामकाज, भरमसाठ रिक्त पदे, पॉझिटिव्ह आलेले कर्मचारी, या अनेक अडचणींचा सामना करूनही महसूल यंत्रणांनी 88 टक्के म्हणजे 81 कोटी 60 लाख 72 हजार 317 रुपये इतकी वसुली केली,
*शेवटच्या टप्प्यात 29 कोटी केले वसूल*
दरम्यान 1 एप्रिल 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पावेतो 53 कोटी रुपये इतकीच वसुली करण्यात आली, मात्र जिल्हाधिकारी एस, रामामुर्ती, आरडीसी दिनेश गीते यांनी एसडीओ, तहसिल कार्यालयाना कामाला जुंपले, यामुळे एकट्या मार्च महिन्यात तब्बल 28 कोटी 57 लाख 76 हजार रुपये वसूल करण्याचा पराक्रम यंत्रणानी केला, यासाठी खनिकर्म अधिकारी डॉ, राठोड, संजय वानखेडे, राजेंद्र एंडोले, प्रशांत रिंढे यांचेही योगदान महत्वाचे ठरले,