ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोताळ्यात येथे र 9 मे ला  रक्तदान शिबिरचे आयोजन

0
115

ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोताळ्यात येथे र 9 मे ला  रक्तदान शिबिरचे आयोजन

बुलडाणा : कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस तथा जि. प. सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ९ मे रोजी मोताळा येथील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित केले आले आहे. या शिबिरात नागरिकांनी उस्फुर्तपणे रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. जवळपास सर्वच हॉस्पिटल्स रुग्णांनी गच्च भरले आहेत. रुग्णांना वेळेवर बेड मिळणे कठीण झाले आहे. आरोग्य यंत्रणा आपल्यापरीने ताकदीने प्रयत्न करीत आहे. परंतु ही सर्व परिस्थिती हाताळतांना त्यांच्यावर प्रचंड ताण वाढलाय. अशावेळी समाजातूनही आरोग्य यंत्रणेला मदतीची रसद पुरविणे गरजेचे आहे. सध्या राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून जनतेला वेळोवेळी रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मोताळा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. समाजाबद्दल तळमळ आणि सामाजिक जाण अन भान असणाऱ्या जि. प. सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रविवारी सकाळी ९ वाजता हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन अरविंद चोपडे, मिलिंद जैस्वाल, विजय सुरडकर, सोपान धोरण, गजानन बोदडे, गजानन डोंगरे, मिलिंद अहिरे, सुजित खर्चे, अमोल देशमुख,गणेश शिंदे, अक्षय चव्हाण, अमोल एन्डोले, वैभव चव्हाण, शुभम सरोदे, अजित किनगे, जयंत चोपडे, नितीराज राजपूत, राजेंद्र जंगले, राजेंद्र पाटील, नीळकंठ खर्चे, श्रीकांत आढाव, संदीप रायपुरे, गोपाल सातव, सुनिल पाटील, हमीद कुरेशी, नरेश इंगळे, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन राजपूत, संजय आमले, ईश्वर काळे, शैलेंद्र पाटील, महेश ढोण आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here