- तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल….२४ मोटार सायकली…पोलीसांची कारवाई ….
: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मॉर्निंग वॉक आणि स्विमिंगसारख्या गोष्टींवर देखील निर्बंध आहेत. मात्र, काही नागरिकांकडून या नियमांचं उल्लंघन होत असल्याने बुलडाणा जिल्हयातील खामगाव पोलिसांनी अशा लोकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी स्वतः तलावावर पोहचून नियम मोडत नदीत पोहणाऱ्या १८ नागरिकांवर कारवाई केली. पोलिस कारवाईमुळे पोहणाऱ्यांना आपले कपडे नदीच्या काठावरच सोडून पळ काढण्याची नामुष्की आली. मात्र पोलिसांनी सर्वांना पकडून पोलीस स्टेशनला आणले. यावेळी २४ मोटार सकाळीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
: बुलडाणा जिल्हयातील खामगाव शहराजवळील जनुना तलावात काही युवक पोहण्यासाठी आले असल्याची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांनी शिवाजी नगर पोलिसांना सोबत घेऊन स्वतःतलाव गाठले.यावेळी पोलिसांना पाहून नदीत पोहणाऱ्यांना आपले कपडे सोडून तसाच पळ काढावा लागला. पोलिसांनी तलावात पोहत असलेल्याना धर-पकड सुरु झाली यावेळी पोलीस दिसताच अनेक जण पळून जाण्याच्या प्रयत्नात होते मात्र पोलिसांनी यापैकी १८ जणांना पकडले. तर उर्वरित लोकांचे पोहणाऱ्यांचे कपडे ताब्यात घेतले. हे पाहताच पोहणारे नदीच्या दुसऱ्या काठाकडून उघडेच पळाले. यानंतर पोलिसांनी नदी किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या या पोहणाऱ्यांच्या २४ गाड्या जप्त केल्या आहेत. व सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.